पुणे : किसानपुत्र आंदोलन आणि पुण्याच्या फोरम ऑफ इंटेलिकच्युअल्सच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. 16 ते 35 वयोगटातील कोणीही त्यात भाग घेऊ शकतो. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. जास्तीजास्त तरुण व तरुणींनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब व फोरमचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले आहे.
विषय आणि बक्षिसे
स्पर्धकांनी खालील तीन पैकी कोणत्याही एका विषयावर दीड हजार शब्दांचा निबंध लिहावा. १. शेतकऱ्यांचा आत्महत्या : कारणे आणि उपाय, २. स्त्री आणि शेतकरी संकटात, ३. शेतकरीविरोधी कायदे. निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी या पैकी कोणत्याही भाषेत लिहता येईल.प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. या शिवाय पाचशे रुपयांची पाच बक्षीसेही दिली जाणार आहेत.निबंध खालील पत्यावर पाठवावेत .सतीश देशमुखजी 65, आदित्य नगर, गाडीतळ, हडपसर, पुणे-411028 मो. 9881495518