किसान मंचचा असहकार आंदोलनाचा इशारा

0

अमरावती । सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी जनजागृती म्हणून सेवाग्राम ते नाशिकदरम्यान किसान मंचच्या वतीने 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत शेतकरी सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास सरकारविरोधात असहकार पुकारण्याचा निर्णय किसान मंच घेणार असल्याचा इशारा संघटनेचे निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे व ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी दिला. शहरातील शासकीय विश्रामगृहात विदर्भातील किसान मंचच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आले होते. योग्य हमीभाव व शेतकरी-शेतमजुरांसाठी कायदेशीर तसेच आर्थिक संरक्षण हमी अशा प्रमुख मागण्या सरकारपुढे मांडण्यात आल्या आहेत.