पारोळा । येथील किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रेड रिबीन क्लबची स्थापना करण्यात आली. रेड रिबीन क्लबच्या वतीने पारोळा शहराच एच.आय.व्ही. एड्स संदर्भात रॅली काढण्यात आली. यावेळी पथनाट्य गीते सादर करण्यात आली. पथनाट्य रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी हिरवी झेंडी दावखून रॅलीचे विसर्जन कुटीर रुग्णालय पारोळा येथे करण्यात आले. यानंतर कुटीर रुग्णालय पारोळा येथे डॉ.सुरेश पाटील, डॉ.प्रवीण पाटील, डॉ. धीरज पाटील, डॉ.प्रशांत रनाळे तसेच एच.आय.व्ही.समुदेशक अहिरे, किशोर पाटील यांनी किसान महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना एच.आय.व्ही एड्स विषयीवरील कार्यशाळेत एच.आय.व्ही एड्स संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
एचआयव्हीबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन
एच.आय.व्ही. एड्स या जीवघेण्या आजारापासून देशाला वाचविण्यासाठी देशाचे आंधारस्तंभ असलेल्या महाविद्यालयीन तरुणांनी या आजाराची कारणे जाणून घेतली. यात एड्सवर उपाय कोठे केले जातात? आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? याविषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी समाजात याविषयी जागृती निर्मा करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्चाची उत्तरे सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.ए.शेळके यांनी केले. प्रा.डॉ.सविता चौधरी यांनी आभार मानले.