पारोळा प्रतिनिधी । येथील किसान महाविद्यालयात युवती सभेअंतर्गत विद्यार्थिनी व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा झाली.
या कार्यशाळेला प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. रेवानंद पाटील, प्रा. मनोज चौधरी, प्रा. नितीन पाटील, प्रा. श्यामकांत श्रीराव, उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे, प्रा.अनिल वाघमारे, प्रा. प्रदीप अजुकर, प्रा. अनिता मुडावदकर उपस्थित होत्या. निकिता पाटील, मेघना पाटील, पूनम अहिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वप्नाली राठोड यांनी आभार मानले.