किसान शिक्षण संस्थेमार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाखाची मदत

0

पाचोरा (प्रतिनिधी) : दि १९ भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेमार्फत राज्यातील कोरोना आजाराच्या पाश्वभूमीवर गरजू रुग्णांना मदतीसाठी संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या शुभहस्ते शासकीय स्तरावर पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (पाटील) भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे नायब तहसिलदार रमेश देवकर यांच्याकडे संस्थेच्या कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ कडे जमा करण्यासाठी १लाख ११ हजार १०१ रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संचालक प्रशांतराव विनायक पाटील डाँ.पूनम प्रशांतराव पाटील व ग.स.सोसायटी चे माजी अध्यक्ष विलास नेरकर , सुधाकर पाटील मान्यवर उपस्थित होते.