कुंझर शिवारात करमूड येथील महिलेचा विनयभंग

0

चाळीसगाव : करमूड ता चाळीसगाव येथील 35 वर्षीय महिला तालुक्यातील कुंझर शिवारातील शेतात कपाशी वेचत असतांना करमूड येथील एकाने मागवून पकडून या महिलेचा विनयभंग केल्याची घटना 12 डिसेंबर 2016 रोजी घडली असून आरोपी विरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशन ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 डिसेंबर 2016 रोजी तालुक्यातील कुंझर शिवारातील शेतात करमूड ता चाळीसगाव येथील 35 वर्षीय महिला शेतात कपाशी वेचत असतांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास करमूड ता चाळीसगाव येथील आरोपी दिलीप हिम्मत पाटील याने महिलेच्या मागून येऊन तिचे शी गैर वर्तन केले व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला आहे महिलेने लागलीच आरडा ओरड केल्याने आरोपीने तेथून पलायन केले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी दिलीप हिम्मत पाटील याचे विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो हे कॉ महेंद्र पाटील करीत आहेत.