कुंटणखाण्यावर धाड, दोन महिला ताब्यात

0

भुसावळ। शहरातील जामनेर रोडवरील वैतागवाडीतील कुंटणखाण्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकत दोघा महिलांना ताब्यात घेतले तर वेश्या व्यवसाय चालवणारी मालकिण मात्र पसार झाली. या प्रकरणी मीना उर्फ बेबी शेख हमीद (रा.लेंडीपूरा, वैतागवाडी) विरुद्ध बाजारपेठ पोलिसात पीटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, हवालदार दिलीप येवले, शशीकांत पाटील, विनोद पाटील, रवींद्र पाटील, संजय पाटील, शरीफ काझी, अशोक चौधरी, संजय सपकाळे, दीपक पाटील, विकास पाटील, दर्शन ढाकणे, शरद सुरळकर, महिला पोलीस कर्मचारी वहिदा तडवी, सविता परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

वेश्या व्यवसाय जोमात
शहरातील शहरातील जामनेर रोडवरील वैतागवाडीत या कारवाईवरून पुन्हा वेश्या व्यवसाय जोमात सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी धडक कारवाई करीत 21 महिलांची सुटका करीत आंबटशौकीन ग्राहकांसह हा व्यवसाय चालवणार्‍या दलालांसह मालकिणींना अटक केली होती. कारवाईनंतर पुन्हा हा व्यवसाय जोमात सुरू झाल्याने पोलिसांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कुंटण खाण्यात गुन्हेगारांचा डेरा
वैतागवाडीतील कुंटणखाण्यात अनेकदा पोलिसांकडून कारवाई झाली असलीतरी हा व्यवसाय अद्यापही बंद झालेला नाही. वैतागवाडीत राज्या-परराज्यातील गुन्हेगार रात्री-बेरात्री येत असल्याने पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी काही मालकिणींच्या घरांना सील करण्यात आले मात्र पुन्हा या व्यवसायाने आता डोके वर काढले आहे.