कुंटणखाना चालविणार्‍या चार घरांना सील

0

भुसावळ। शहरातील कुंटणखाना चालवणार्‍या चार दलालांच्या घरांना शुक्रवार 2 रोजी दुपारी 12 वाजता बाजारपेठ पोलिसांनी सील ठोकल़े चार दिवसांपूर्वीच प्रांताधिकार्‍यांनी या संदर्भात आदेश पारीत केल्याने त्याची अंमलबजावणी करण्यात आली़. सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी एप्रिल महिन्यात कुंटणखान्यावर छापा टाकून कारवाई केल्यानंतर घरांना सील करण्यासंदर्भात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता़ त्यानुषंगाने प्रांतांनी आदेश पारीत करीत चौघांच्या घरांना एका वर्षासाठी सील ठोकण्याचे आदेश दिले होते.

पथकात यांचा होता समावेश
पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, सुनील सोनवणे, नाईक प्रवीण ढाके, महेंद्र लहासे, बाळू पाटील आदींच्या पथकाने वैतागवाडीतील दलालांच्या घरांना सील ठोकल़े. त्यात मयत किसनलाल रामलाल खन्ना व परवेजखान सलीमखान यांच्या घरात दलाल शेख चांद शेख हमीद व रफिक शेख शकीर हे व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या दोन घरांसह मोहम्मद हसन मोयाकूब व कमल अतुल पाल यांच्या घरांना सील लावण्यात आले.