अमळनेर । येथील गांधलीपुरा भागातील बेकायदा कुटनंखाने व अनैतिक व्यापार इतरत्र हालविण्यासाठी 25 फेब्रुवारी रोजी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ संदानशिव यांच्यासह 150 ते 200 पुरुष महिला सह सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपोषणाला बसले होते. संपूर्ण नाशिक विभागात जळगावचे हैदरी थियटर आणि जामनेरचे माहिजी हे गाव अवैद्य वेश्या व्यवसाय व कुटंनखान्यासाठी प्रसिद्ध होती. पण जनतेच्या चळवळीमुळे सामाजिक स्वास्थ्य व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन्ही वसाहती हलविण्यात आल्या आहेत. त्या आता शहरातील गांधलीपुरा भागातील अजंता टाकी व बौद्ध वाडा नदीकाठ परिसर या भागात स्थलांतर झाल्या आहेत. डॉ आंबेडकर पूतळ्या समोरील अजंता टाकी परिसरात सुमारे 300 ते 400 अल्पवयीन मूली ह्या प. बंगाल, गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यातील पळवून आणलेल्या तरुणी आहेत असा दावा रामभाऊ संदानशिव यांनी केला आहे.
स्थानिक नगरसेवकांच्या अभयाचा आरोप
रामभाऊ संदानशिव यांनी बोरी नदी काठावर 100 च्या आसपास मुलींना स्थानिकांनी अतिक्रमणातील स्वतःची घरे दिली आहेत असे सांगितले आहे. हे कुटनंखाने हलविण्यासाठी बर्याचदा आंदोलन उपोषणे झालीत. मात्र स्थानिक नगरसेवक व त्यांच्या गुंडाचा आश्रयामुळे पोलिस प्रशासन कारवाई करण्यासाठी हतबल झाले आहे. तर स्थानिक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे जळगाव एलसीबी कडून नाममात्र किरकोळ स्वरूपची कारवाई दोन तीन वेळा करण्यात आली आहे. या ठिकाणी सराइत गुन्हेगारांचा वावर असतो. तर अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून या ठिकाणी एका घरात 20 ते 25 मूली ठेवल्या आहेत. ह्याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे असे रामभाऊ संदानशिव यांनी म्हटले आहे.
डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषण
या त्रासाला कंटाळून गांधलीपुरा भागातील दलित आदिवासी अल्पसंख्यांकांनी व शहरातील काही सामजिक संघटनांनी दलित नेते रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली शनिवार 25 फेब्रुवारी रोजी ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. या यावेळी मा.आमदार साहेबराव पाटील, मा.नगराध्यक्ष नाना रतन चौधरी, नगरसेवक नरेंद्र संदानशिव ,मा. नगराध्यक्ष सुभाष आण्णा चौधरी ,मा. नगरसेवक विनोद कदम, नगरसेवक शेखा हाजी मिस्तरी,सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांच्यासह 150 ते 200 पुरुष महिला सह सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.