कुंडाणेचा लाचखोर ग्रामसेवक धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

माजी सरपंचांकडून अनामत परत करण्यासाठी मागितली 50 हजारांची लाच

धुळे- माजी सरपंचांकडून अनामत परत करण्यासाठी 50 हजारांची लाच मागणार्‍या तालुक्यातील वार-कुंडाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला धुळे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केल्याने ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजाराम बारकु सांगळे (43, रुपाई नगर, साक्री) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व सहकार्‍यांनी केली.