मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबळेला टीम इंडियाचे डायरेक्टर पद मिळणार असल्याची चर्चा आहे. जर भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी संचालकपदी नियुक्ती झाली तर त्याच्या जागेवर भारतीय संघाचा नविन प्रशिक्षक म्हणून अंडर-19 व टीम इंडिया-ए प्रशिक्षक राहुल द्रविड यांची नियुक्तीची चर्चा सुरू आहे. गेल्यावर्षी रवी शास्त्रीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून बीसीसीआयमध्ये संचालकपद रिक्त आहे.बीसीसीआय या पदावर पुन्हा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्याच्या विचारात नाही आहे.
भारत-कांगारूची मालिका शेवटची ठरू शकतो….
बीसीसीआयचे रिक्त असलेले संचालकपदावर भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसचा अनिल कुंबळे यांना देण्यात आला आहे. अनिल कुंबळे संचालकपदी निवड झाल्यास भारत – ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिका शेवटी ठरू शकते.अनिल कुंबळे हे जर संचालकपदी गेले तर त्याच्या प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार व संघाची दिवार म्हणून ज्याची ओळख आहे. असे राहूल द्रविड यांची नियुक्ती होऊ शकते. भारतीय संघात खेळतांना राहुल द्रविड यांनी अनेक विक्रम केले आहे. त्याच बरोबर त्यांनी ज्युनियर संघ व भारतीय अ संघाला सध्या ते प्रशिक्षीपदी नियुक्त आहे.
ज्युनिअर व महिला संघाचे रिपोर्ट मागविले
बाद करण्यासाठी जगातील सर्व गोलंदाज प्रयत्न करित असत असा राहुल द्रविड याची नियुक्ती शक्यता आहे.बीसीसीआयच्या अॅडमिन कमिटीने कुंबळेला आपला रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. या रिपोर्टमध्ये ज्युनिअर आणि महिला संघाचे रिपोर्टही मागवण्यात आले आहेत. बीसीसीआयने अनिल कुंबळेलाही या प्रपोजलवर विचार करण्यासाठी वेळ दिला आहे.अनिल कुंबळेचे उत्तर आल्यानंतर व रिपोर्ट पाहिल्यानंतर कमेटी क्रिकेट सल्लागार समितीसोबत मिटिंग करेल.या भारतीय क्रिकेट सल्लगार समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण आहेत.