सोलापूर-राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. अयोध्येत सरयू नदीकाठी शिवसेनेने महामेळावा घेऊन राम मंदिर उभारण्याची मागणी केली. त्याच धर्तीवर आज चंद्रभागा नदीकाठी पंढरपुरात शिवसेना महामेळावा घेत आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी शिवसेनेचा हा मेळावा असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सरकारला टोला लगावला.
अयोध्येत झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आम्ही गेलो होतो, आज चंद्रभागातीरी देखील कुंभकर्णाला गाड झोपेतून जागविण्यासाठी शिवसैनिक एकत्र आले असून राम मंदिर उभारल्याशिवाय कुंभकर्णाला झोपू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.