कुंभमेळ्यातील दिंगबर आखाड्याला भीषण आग !

0

प्रयागराज-उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होत आहे. कुंभमेला सुरू होण्याच्या एक दिवस आधी संगम तटावर उभारण्यात आलेल्या दिंगबर आखाड्याच्या तंबुंना भीषण आग लागली आहे.

अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगीत तंबूतील सर्व सामान जळून खाक झाले आहे. उद्या मंगळवारपासून शाही स्नानाने कुंभ मेळ्यास औपचारिक सुरूवात होणार आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कुंभ मेळा स्थळावरील सेक्टर १६ येथील दिंगबर आखाड्याच्या तंबुत आज अचानक आग लागली. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या साधु-संतामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यादरम्यान सुमारे एक डझन तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिलिंडरच्या गळतीमुळे मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग भडकल्याचे सांगण्यात येते. आगीमुळे संपूर्ण तंबू जळून खाक झाले असून आमचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती एका साधूने दिली.