मुक्ताईनगर प्रतिनिधी – कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती बैठक घेण्यात आली. यावेळी महत्वाचे मुद्दे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर मांडण्यात आले. त्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साकारात्मक भुमिका घेतल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की
कुंभार समाजातील नागरिक पारंपारिक भांडे, मुर्त्या व विटा बनविण्याचा व्यवसाय करतात. ही लोकं पुरातन काळापासून कला जोपासत असताना याच व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदर निर्वाह देखील करतात. अशा लोकांना 500 ब्रास माती त्या त्या तालुक्यात प्रत्येक कुंभार समाजातील कारागिराला मिळाली पाहिजे असा शासनाचा अध्यादेश आहे. परंतु मागील वर्षी एकही ब्रास माती या लोकांना मिळाली नाही.अशा प्रकारच्या तक्रारी घेवून कुंभार समजातील जिल्हा अध्यक्ष, प्रांताध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व समाज बांधव यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आलेली होती परंतु पालकमंत्री यांची आज मुंबई येथे बैठक असल्याने पालकमंत्री यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज ही बैठक लावून घेतली व कुंभार समाजातील विविध मागण्या आणि समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष शेखर कापडे, प्रभाकर सोनवणे, रामभाऊ पुनासे, मनोज कापडे, प्रभाकर कापडे, प्रभाकर कापडे, सखाराम मोरे, घनशाम हरणकर, वासुदेव आव्हाणे, योगेश हिवरकर, विजय पंडित, संतोष कापडे, रविंद्र प्रजापती आदींसह जिल्हाभरातील कुंभार समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.