कुंभ मेळ्यासाठी प्रयागराज स्थानकावर मेल व एक्स्प्रेस गाड्यांना थांबा

0

भुसावळ- प्रयागराज येथे होत असलेल्या कुंळ मेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक मेल व एक्स्प्रेस गाड्यांना 13 जानेवारी ते 5 मार्चपर्यंत तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या गाड्यांना मिळाला थांबा
11053/11054 लोकमान्य टिळक टर्मिनस-आजमगढ़-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11055/11056 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस, 11059/11060 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11071/11072 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस, 12165/12166 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस, 22103/22104 लोकमान्य टिळक टर्मिनस-फैजाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11067/11068 लोकमान्य टिळक टर्मिनस-फैजाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस साकेत एक्सप्रेस, 21067/21068 लोकमान्य टिळकटर्मिनस-रायबरेली-लोकमान्य टिळकटर्मिनस साकेत लिंक एक्सप्रेस या गाड्यांना प्रयागराज येथे थांबा देण्यात आला आहे.