कुकडीत 42.25 टक्के पाणीसाठा

0

जुन्नर । गेल्या आठवड्यापासून जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे़ त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे़. कुकडी प्रकल्पात 42.25 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़

येडगाव धरण हे 75.71, डिंभा 53.58 आणि चिल्हेवाडी धरण 73 टक्के भरले आहे़ वडज धरणातून मीना नदीत 1100 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर यांनी दिली.

सर्व धरणांमध्ये 42.25 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ मागील तीन दिवसांमध्ये सर्व धरणांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी आजमितीला 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. वडज व चिल्हेवाडी धरण हे कमी क्षमतेचे आहेत़ वडज धरणात 48.22 टक्के पाणीसाठा झाला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून आजअखेर 387 मिलिमीटर पाऊस झाला आहे़ धरणात पाणीसाठा वाढत असल्याने या धरणातून मीना नदीत विसर्ग सुरू आहे. चिल्हेवाडी धरणातून 2900 क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू आहे. या धरणात 73 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 1 जूनपासून आजअखेर 451 मिलिमीटर पाऊस येथे झाला आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 15 मिलीमीटर पाऊस झालेला आहे़ येडगाव धरणात 75.71 टक्के पाणीसाठा झाला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून आजअखेर 479 मिलिमीटर पाऊस झाला आहे़ या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 13 मिलिमीटर पाऊस झाला आहे़ माणिकडोह धरणात 34.75 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजअखेर 572 मिलिमीटर पाऊस झाला आहे़