कुक्कुट पालनातून रोजगाराची संधी

0

जळगाव । एकात्मिक बालविकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात खाजगी कुक्कुट संगोपन केंद्र स्थापन करावयाचे असून यासाठी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारीयांच्याकडे 21 जुलै पर्यत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त यांनी केले आहे. अनुसूचित क्षेत्र, आदिवासी उपयोजने अंतर्गत आदिवासी क्षेत्रामधील लाभार्थ्यांना ग्रामीण परसातील कुक्कुट पालन संगोपन केंद्र स्थापन करुन अंगणवाड्यातील मुलांना आहारांमध्ये अंडयाचा पुरवठा करणे व स्वंयरोजगार निर्मितीसाठी स्वंयम प्रकल्पव्दारे जिल्हयातील आदिवासी तालुक्यातील नागरिकांना लाभ होणार आहे.

प्रतिलाभार्थी 45 पिल्लांचे वाटप
या प्रकल्पातुन आदिवासी भागातील रहिवासींना स्वयंरोजगाराची संधी निर्माण झाली आहे. एका मदर युनिट अंतर्गत 417 लाभार्थ्याना तीन टप्प्यात एकूण 45 पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी मदर युनिट व लाभार्थ्याचे स्वतंत्र अर्ज पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावे. लाभ घेण्याच्या अटी व शर्ती संबंधी पंचायत समिती कार्यालयात माहिती मिळणार आहे. लाभार्थ्याचे बॅक खाते आधारकार्ड संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच याबाबतचा तपशिल शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी दिली आहे.