मुंबई: बॉलिवूडच्या नामांकित दिग्दर्शकांच्या यादीत करण जोहरचे नाव नेहमीच असते. १९९८ मध्ये आलेला ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातून करण जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाने त्यावेळच्या रोमॅन्टिक चित्रपटांची व्याख्या बदलली होती आणि चित्रपट सुपरहिट ठरला. आता करण जोहरने या चित्रपटाचा सिक्वेल बनवायचा विचार केला आहे.
एका कार्यक्रमात त्याला विचारण्यात आले, की जर ‘कुछ कुछ होता है’चा सिक्वेल बनवला, तर त्यात कोणत्या कलाकारांना संधी मिळेल. यावर कारणने उत्तर दिले, की ‘मी या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूरला कास्ट करेल’. या तिनही कलाकारांना एकत्र घेऊन करणने जर ‘कुछ कुछ होता है’चा सिक्वेल तयार केला, तर त्याबाबत चाहत्यांना नक्कीच उत्सुकता निर्माण होऊ शकते.