कुटुंबवत्सल सदस्य संसाराच्या अवीट नात्यातून बाहेर पडू शकत नाही!

0

धुळे । कुटुंब वत्सल सदस्य संसाराच्या अवीट नात्यातून बाहेर पडू शकत नाही. परीक्षा देणार्‍यांनी स्वावलंबी राहिले पाहिजे. मौज आणि मौन हे माणसाला सुखी करते. असा दृष्टांत भागवताचार्य खगेंद्रजी महाराज ब्राह्मणपुरीकर यांनी दिला. यावेळी सादर झालेला रुख्मिनी विवाह शामियानात घोड्यावरून आलेली श्रीकृष्णाची शोभायात्रा आकर्षण ठरले. पवित्र अधिकमासाचे औचित्य साधून येथील महाराणा प्रताप हायस्कुलच्या प्रांगणात जयहिंद महाविद्यालयाच्या (ज्युनिअर) बाजूला सुरू झालेल्या भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 23 मे रोजी या सप्ताहाचा समारोप झाला.

अहिराणी साहित्यातील भजनांचाही भाविकांनी घेतला आनंद
महाराज म्हणाले, गेल्या सहा दिवसांपासून केवळ परीक्षा या विषयावर कथा श्रवण झाले. प्रपंचात परीक्षा घेतली जाते. परमार्थात मात्र परीक्षा घेतली जात नाही. सगळ्याच गोष्टींचा त्याग करता आला तो खरा परमार्थ साधणारा व्यक्ती असतो. संत साहित्याचा आवर्जून उल्लेख करताना महाराजांनी अहिराणी साहित्यातील भजनांचा भाविकांना आस्वाद दिला. काहीही चुकी नसतांना एखाद्या दिवशी होणारे आरोप एवढे जिव्हारी लागतात की संसार सोडून लांब कुठेतरी निघून जावेसे वाटते. असे महाराज म्हणाले.

मान्यवरांनीही घेतले दर्शन
भाजपाच्या गटनेत्या प्रतिभा चौधरी, भागवत कथेचे निमंत्रक शिवाजीराव चौधरी, अमोल चौधरी, प्रा. सागर चौधरी यांनी आयोजित केलेल्या या भागवत कथा सप्ताहाला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख व उपायुक्त रवींद्र जाधव, आ. कुणाल पाटील, माजी आ. प्रा. शरद पाटील, पोलीस उपअधिक्षक सचिन हीरे, पो.नि. दत्ता पवार, मनपाचे शहर अभियंता कैलास शिंदे, अ‍ॅड. शामकांत पाटील, विनोद मोराणकर, महेश मिस्तरी व विविध मान्यवरांनी पवित्र भागवत कथा ग्रंथ आणि महाराजांचे दर्शन घेतले.