कुटुंबातील व्यक्तींचे आवाज ऐकून बिग बॉसचे स्पर्धक झाले भावूक

0

मुंबई : कॉंट्रोव्हर्सी शो ‘बिग बॉस १२’ मध्ये हॅपी क्लबचे सर्वच सदस्य नॉमिनेट झाले आहे. घरातील सदस्यांना आनंदी करण्यासाठी बिग बॉसने सदस्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे आवाज ऐकवले. यामुळे सगळे सदस्य भवूक झाले.

काही दिवसांपासून बिग बॉसमधील स्पर्धकांचे एकमेकांसोबत भांडण होत आहे. याचे कारण म्हणजे श्रीशांतने आपला गेम खेळत आणि कॅप्टनीचा वापर करत हॅपी क्लबच्या सर्व सदस्यांना नॉमिनेट केले आहे. ज्यात दिपक, सुरभी, रोमिल आणि सोमी यांचा समावेश आहे.

या आठवड्यासाठी याच क्लबने श्रीशांतला कॅप्टन बनवले होते, यामुळे श्रीशांतवर पूर्ण हॅपी क्लब नाराज आहे. बिग बॉसने वातावरण थंड करण्यासाठी ही शक्कल लढवली आहे.