नायगावच्या तरुणीला ठार मारण्याची धमकी देत विनयभंग

कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप : शिरसोलीच्या तरुणाविरोधात यावल पोलिसात गुन्हा

यावल : तालुक्यातील नायगाव येथील एका 22 तरुणीशी ओळख करून ओळखीचा गैरफायदा घेत लग्न करण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी शिरसोली येथील एका तरूणाविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुटुंबाला ठार मारण्याची धमकी
नायगाव, ता.यावल येथील रहिवासी 22 वर्षीय तरुणी ही जळगाव येथे शिक्षणासाठी नातेवाईकांकडे 2018 पासून होती तेथे तिची ओळख शिरसोली, ता.जळगाव येथील शांताराम श्रावण ठाकूर या तरुणाशी झाली व हा तरूण जुलै 2018 पासून ते 27 नोव्हेंबर 2021 या कालावधीत तरुणीशी जवळीक साधत होता. तरुणी जळगाव येथे क्लासेसला जात येत असतांना तिच्या सोबत ओळख करीत नंतर तिच्या नायगाव येथील घरीदेखील आला. 27 नोव्हेंबर रोजी तरुणीच्या घरी जावुन माझ्याशी लग्न कर, अशी मागणी घातली तसेच तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबास जिवंत सोडणार नाही, असा दमही या तरुणाने देत तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. घाबरलेल्या तरूणीने कुटुंबीयांची चर्चा केली व शनिवारी यावल पोलिसात तक्रार दिली. शांताराम ठाकुर (रा.शिरसोली) या तरुणाविरूद्ध विनयभंग, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, अजीज शेख हे करीत आहे.