कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप

0

एरंडोल । शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी शाखेच्या वतीने पाच महिला लाभार्थ्याना आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. तहसीलदार कार्यालयात विमलबाई झिपरू पाटील(एरंडोल), ललिताबाई सुभाष राठोड(खेडगाव), तुळसाबाई संजय महाजन(तळई), शितल विजय महाजन(एरंडोल),जिजाबाई रमेश मोरे (पिंपळकोठा बुद्रुक) या पाच महिला लाभार्थ्याना आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी तालुक्यात ज्या गावात पाण्याची समस्या निर्माण होईल. त्या गावाची माहिती त्वरित आपणास द्यावी असे सांगितले. नागरिकांनी देखील पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले.

धनादेश देताना यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र देसले, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, पराग पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, शहराध्यक्ष अहमद सय्यद, तहसीलदार सुनीता जर्‍हाड, संजय गांधी योजनेचे तहसीलदार ए.एल.ठाकूर, के.डी.रासने यांचेसह महसूल कर्मचारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ.सतिश पाटील यांनी तालुक्यात आगामी काळात निर्माण होणार्‍या पाण्याच्या समस्येबाबत तहसीलदार यांचेकडून माहिती जाणून घेतली. पाण्याची समस्या त्वरित सोडविण्याच्या त्यांनी दिल्या.