एरंडोल । शासनाच्या कुटुंब अर्थसाहाय्य योजने अंर्तगत संजय गांधी निराधार शाखेच्यावतीने पाच लाभार्थी महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तहसीलदार कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खासदार ए.टी.पाटील भाजपाचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, संजय गांधी समितीचे अध्यक्ष सुनील पाटील, संभाजी चव्हाण यांचेहस्ते शोभाबाई पाटील (आडगाव), मंगलाबाई महाजन (विखरण), इंदुबाई श्रीराम सुरसे (रिंगणगाव), निर्मलाबाई महाजन(रिंगणगाव), निर्मलाबाई सोनवणे या लाभार्थी महिलांना प्रत्येकी वीस हजार रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
शेतकरी आत्महत्याग्रस्त योजनेत जनाबाई भिकन पाटील (अंतुर्ली ता.एरंडोल) यालाभार्थी महिलेस भाजपाचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा दानादेश देण्यात आला. यावेळी तहसीलदार सुनिता जर्हाड, नायब तहसीलदार ठाकुर, संजय पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, उपनगराध्यक्ष जाहीरोद्दिन शेख कासम, नरेंद्र पाटील, ऋशिकेश पाटील, सचिन पानपाटील, डॉ.शांताराम वाघ, संजय साळी, पल्लवी पाटील, बाजीराव पांढरे, मधुकर देशमुख, नरेश ठाकरे, भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, राजेंद्र पाटील, चरणदास पवार यांचेसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.