कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत भुसावळात लाभाथींना धनादेशाचे वाटप

0

भुसावळ- राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यक योजनेंतर्गत लाभार्थींना सोमवारी तहसील कार्यालयात आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार तायडे, संजय तायडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, संजय गांधी योजनेचे ग्रामीणचे नायब तहसीलदार एस.एस.निकम, शहरचे नायब तहसीलदार पी.बी.झांबरे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी लाभार्थी उषा सुभाष सावकारे, शोभा गजानन पाटील, भारती यशवंत भारसके, प्रमिला सदाशीव कुरकुरे, कौशल्य तेजमल मेहरे, साधना सुनील सुरवाडे, विमलबाई मुरलिधर माळी, मीना मनिराज नायडू, कविता सिद्धार्थ सपकाळे, सुनंदा सुनील सपकाळे, सुनीता मगन कोळी, बेबाबाई समाधान पारधे या लाभार्थींना प्रत्येकी 20 हजारांचा धनादेश देण्यात आला. दरम्यान, कार्यक्रमानंतर आमदारांना व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.