जळगाव । आरोग्य चांगले राहावे म्हणून घरी बनविलेलाच सकस आहार घ्यावा. बाहेरच्या वस्तु खाऊ नये. फळे, शिरा, उपमा यासारखे पदार्थ खाल्ल्याने आपले आरोग्य उत्तम राहते. तसेच कुटूंबियांसाठी वेळ देत असतांना स्वत:साठी थोडा तरी वेळ द्या, असा सल्ला डॉ. सुजाता महाजन यांनी दिला. जागतिक महिला दिनानिमित्त वुमेन अॅण्ड चाईल्ड केअर प्लसच्यावतीने कष्टकरी महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शोभा हंडोरे, विद्या सोनवणे, निवेदीता ताठे, मनिषा बागुल, संस्थेच्या उपाध्यक्षा संगिता यादव, लिना कुळकर्णी, अनिता बडगुजर, छाया पाटील, नंदा पाटील, हेमलता कुळकर्णी आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना डॉ. महाजन यांनी स्वच्छता महत्वाची असून अस्वच्छता व खराब पाण्यामुळे अनेक आजार होतात. म्हणून स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. संस्थेतर्फे कष्टकरी महिलांसाठी विविध स्पर्धा, खेळ व कौटुंबिक यासह आरोग्यावर मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले. महिलांनीही या उपक्रमांचा आनंद घेतला.