साक्री । मालेगाव येथील दुकानदारांवर हल्ला करणार्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनतर्फे तहसिलदारांना निवदेन देवून करण्यात आली. आधार कार्ड मागितल्यचा राग आल्यामुळे मालेगाव तालुक्यांतील स्वस्त धान्य दुकानदार गणेश तिवारी यांना कार्डधारक इब्राहीम खान गुलाब खान याने मारहाण केली. तसेच फोन करून 30 ते 35 जणांना बोलवून घेऊन तिवारी यांच्या कुटूबियांना घरात घुसून बेदम मारहाण केली. मालेगावमध्ये घडलेल्या प्रकाराचा तीव्र जाहीर निषेध करण्यात आला.
मालेगाव येथे दुकानदारास केली मारहाण
मालेगाव येथील घटनेमुळे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अशा घटना पुन्हा घडू नये याची दखल घेण्याची मागणी केली होती. शासनाने आधार फिडींगचे काम स्वतंत्र यंत्रणेमार्फेत राबविण्याची मागणी केली आहे.पॉसमधील त्रुटीमुळे ही दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून वरील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची करण्यात आली. निवेदनांवर राज्यउपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संजय साबळे, तालुकाध्यक्ष यांची सही आहे.