कुटूंब बाहेर जाताच प्रौढाने केली आत्महत्या

Suicide of one in Rawer City रावेर : शहरातील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश बाबु रील (४५) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रावेरच्या मेहतर कॉलनीतील सुरेश बाबू रील (४५) याची पत्नी माहेरी गेली असताना त्यांनी शनिवार, ३ रोजी आत्महत्या केली तर रविवारी सकाळी त्यांच्या भावाने आपला भाऊ कामावर गेला किंवा नाही हे पाहण्यासाठी घर गाठल्यानंतर सुरेश यांनी घराच्या छताला लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत किरण रील याने रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास फौजदार विशाल सोनवणे करीत आहे