कुठलाही निर्णय घेऊ नका

0

मुंबई । मुंबई क्रिकेट संघटनेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक बाबींशी निगडीत असलेले कुठलेही निर्णय घेऊ नका असा इशारा माजी कार्यकारिणी सदस्य रवी मांद्रेकर यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला दिला आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुका 10 नोव्हेंबरला होणार आहेत.रवी मांद्रेकर यांनी यासंदर्भात मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्श आशिष शेलार यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात मांद्रेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर नेमलेल्या प्रशासकिय समितीने बीसीसीआयने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता दिली नव्हती याकडे लक्श वेधले आहे. याशिवाय मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणुक 10 नोव्हेंबर रोजी करण्याची घोषणा झाली आहे. त्यामुळे जोपर्यत निवडणुका होत नाहीत तोवर विद्यमान कार्यकारी मंडळला केवळ कारभाराची देखरेख करण्याचा अधिकार असल्याचे मांद्रेकर यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.