मुंबई-मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. अहवाल प्राप्त झाला असून १ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल अशी चर्चा सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा खुलासा विधानसभेत केला.
एकंदरीत असलेल्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही असा दावा मुख्यमंत्री यांनी केला आहे.
मराठ्यांना आरक्षण दिल्यास ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसेल अश्या बातम्या माध्यमांकडून प्रसिध्द होत आहे. मात्र माध्यमांकडून चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. माध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.