कुठे बंदला विरोध तर कुठे व्यवसाय बिनबोभाट

भुसावळ : शासनाने महिनाभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायीकांसाठी लॉकडाऊन घोषित केल्याने या निर्णयाचा व्यापार्‍यांना मधून तीव्र विरोध होत आहे. शासन आदेशाचे पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसर्‍या दिवशीही बुधवारी काहीसे संभ्रम असल्याने अनेक भागात विविध व्यावसायीकाने दुकाने उघडल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले तर प्रशासनाकडून कारवाईबाबत मात्र चालढकल होत असल्याने रस्त्यावर पुन्हा नागरीकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. डॉ.अभिजीऊ राऊत यांच्या या आदेशानुसार केवळ जीवनावश्यक दुकानांना सवलत देण्यात आली आहे. याबाबतच स्पष्ट आदेशही जारी झाले मात्र आदेश डावलून अन्य व्यावसायीक देखील दुकाने सुरू करीत असल्याचे चित्र बुधवारी शहरासह परीसरात दिसून आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. दरम्यान, सलून व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने व्यावसायीकांनी बोदवडसह फैजरपूरात राज्य शासनाच्या कृतीचा निषेध व्यक्त केला.

प्रशासनाने मरगळ झटकण्याची अपेक्षा
शहरात पोलिसांकडून अपवादात्मक मास्क न लावणार्‍यांवर कारवाई होत असलीतरी प्रांताधिकारी व पालिका प्रशासनाकडून धडक कारवाईचा अभाव जाणवत असल्याने कोरोनाचा उद्रेक वाढण्याची भीती आहे तर दुसरीकडे व्यवसाय ठप्प असल्याने जगायचे कसे? असा प्रश्‍न व्यापारी उपस्थित करीत आहेत. सर्वच व्यवसायांना परवानगी द्यावी, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, शहरातील बसस्थानकासह अन्य प्रमुख रस्त्यांवर चोरी छुप्या पानटपर्‍या सुरू असून दारूचीदेखील ब्लॅकमध्ये विक्री होत आहे. प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

फैजपूरात आघाडी सरकारचा निषेध
फैजपूर :
नाभिक युवा संघटनेतर्फे आघाडी सरकारचा जाहीर निषेध
कराण्यात आला. फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी कडलग व मुख्याधिकारी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. आतापर्यंतच्या निवेदनांची कोणतीच दखल घेण्यात आली नाही शिवाय आता महिनाभरा दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे. शासकिय निकषाचे पालन करून व्यवसाय करत होता तसाच आता सुद्धा करील व होणार्‍या बेरोजगारीची झळ अंशतः कमी होईल.
शासनाने परवानगी न दिल्यास समस्त सलून व्यवसायिक (नाभिक समाज ) हा रस्त्यावर उतरेल, व येणार्‍या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इत्यादी निवडणुकांवर पूर्ण महाराष्ट्रातून बहिष्कार करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी फैजपूर येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, सचिव प्रमोद जगताप, मयूर बोरसे, गोलू हातकर, अनिल मानकरे, वहिद सलमानी, साजीद सलमानी, सागर जाधव, शुभम सोनवणे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

बोदवडमध्ये तहसीलदारांना निवेदन
बोदवड :
तालुक्यातील नाभिक बांधवांनी तहसीलदारांना सलून दुकाने सुरू करण्याबाबत बुधवारी निवेदन दिले. लॉकडाऊनमुळे शासनाने बंद केलेल्या काही आस्थापनात सलून व्यवसायाचा समोवश केला असून या व्यवसायामुळे आधीच नाभिक समाज बांधवांना मागील लॉकडाऊन मध्ये खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागले शविय उपासमारीवर वेळ आली. यावेळी सुद्धा शासनाने केश कर्तनालयावर निर्बंध आणले. बोदवड तालुक्यातील नाभिक समाजबांधव यांनी तहसीलदार प्रथमेश घोलप यांना निवेदन देत कोरोना नियमांचेच पालन करून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देताना बोदवड तालुकाध्यक्ष विवेक वखरे, सचिव गणेश सोनोने, शहराध्यक्ष अनिल कळमकर, उपाध्यक्ष धनराज शेळके, सचिव आकाश सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष संजय वाघ, संतोष कुंवर, अमोल आमोदकर, अशोक बोरसे, हरीभाऊ सुरंशे, राजेंद्र वर्मा, गणेश बोरणारे, शरद बोरणारे, राजेंद्र बिडके, सोपान महाले, रीतेश बिडके यांच्या स्वाक्षरी आहेत.