कुडपण बुद्रूक ग्रुपग्रामपंचायतीची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर

0

पोलादपूर । दुसर्‍या टप्प्यामध्ये तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून गावपातळीवर ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे ग्रामस्थांकडून जाहिर करण्यात आले. निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रत्येक जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर छाननीवेळी सर्व अर्ज वैध ठरले आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीमध्ये कोणीही अर्ज मागे न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती तहसिल कार्यालयामार्फत देण्यात आली. सरपंचपदासाठी मंदाबाई रघुनाथ शेलार, उपसरंपच पदासाठी रवींद्र रामचंद्र चिकणे तर सदस्य पदासाठी राम धोंडीराम शेलार, सुशिला सुरेश शेलार, निर्मला गणेश शेलार, कुशाबाई कोंडीराम चिकणे आणि शंकर भिमाजी पवार यांची निवड बिनविरोध झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.