पिंपळनेर। कुडाशी-वार्सा रोडावरील झाडांची अवैध तोड थांबवणेबाबत कुडाशी ग्रामस्थांनी पिंपळनेर पोउनि सुनिल भाबड यांना निवेदन देण्यात आले. आमच्या कुडाशी परिसरातील कुडाशी ते वार्सा रस्त्यावर तत्कालीन खासदार कै.रेशमभाऊ भोये यांनी वनाचे व पर्यावरणाचे महत्त्व जाणून परिसरात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केलेले आहे. त्यातील एक म्हणजे कुडाशी ते वार्सा रस्त्यावरील निलगिरी वृक्षांची लागवड गेल्या 25 वर्षांपासून सदर झाडाचे रक्षण सर्व ग्रामस्थांनी केलेले असून सध्या रात्री-पहाटे या वृक्षांची कत्तल अवैदयपणे सुरू असून तरी संबधीतांनी व आपण याकडे लक्ष देवून संबंधीतांनवर कडक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
वार्सा ते कुडाशी रस्त्यावर हे हजारो निलगिरीचे वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा खरोखरच ऊठून दिसतात. पंरतु या वृक्षतोडकडे संबंधीत विभागाने याकडे लक्ष दयावे व होणारी वृक्षतोड थांबवावी. या एका निलगिरीच्या वृक्षा उंची अंदाजे 70 ते 80 फूटाच्या पुढे असतील व जास्त जाड असल्याने चोरांना मोठे वाहन आनल्याशिवाय नेता येत नाही. आजपर्यंत असे अनेक मोठ-मोठे निलगिरीचे वृक्ष तोडून टाकले आहेत. ती वृक्ष तोड थांबवावी अशी मागणी परीसरातून होत आहे. कुडाशी येथील माजी जि.प.सदस्य शिवाजी भोये, विक्रम अहिरे, महाळू शिंदे, दिलीप अहिरे, सुक्राम जगताप, किसन भोयेछोटीराम साबळे, कैलास पवार, सुभाष जगताप, दयाराम अहिरे, मोतीलाल अहिरे, सोमनाथ साबळे, पुणाजी पवार, मंकम बरडे, नारायण शिंदे. आदीच्या या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.