कुणबी समाजोन्नत्ती संघातर्फे विविध कार्यक्रम

0

विक्रोळी । शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणार्‍या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई विभागीय शाखा विक्रोळी-घाटकोपर संलग्न कुणबी युवक मंडळ आयोजित दरवर्षी प्रमाणेच यंदाही त्याच उत्साहाने, एकजुटीने कुणबी शाखेच्या दिनदर्शिका 2018चे प्रकाशन सोहळा दिनांक 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान, विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी येथे समाजोन्नती संघाच्या अनेक पदाधिकारी, सदस्य, सभासद व विविध क्षेत्रातील अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त कुणबी युवक मंडळ, मुंबई निर्मित कुणबी युवा कलामंच, मुंबई प्रस्तुत सम्राट बळीराजा, शोध संस्कृतीचा सत्य इतिहासाचा या सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी युवाशक्तीला समाजाच्या प्रवाहात ओढण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व समाज बांधवानी बहुसंख्येने आपल्या परिवारासोबत उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.