कुत्रा निर्बीजीकरणासाठी 693 रुपये खर्च

0

पिंपरी-चिंचवड: शहरातील भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्याकामी पालिकेने तीन अशासकीय संस्थांना ठेका दिला होता. आता त्यासाठी आणखी एका संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. एका कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी 693 रुपये पालिकेला मोजावे लागत आहेत. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे भटक्या, मोकाट कुत्र्यांच्या संततीला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. पालिकेबरोबरच अनेक अशासकीय संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी योजना, उपक्रम राबविण्यात आले आहेत.

अगोदर तीन, आता एकाला ठेका
लातुर येथील मेसर्स सोसायटी फॉर दि प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू अ‍ॅनिमल (693 रुपये), नवी मुंबई येथील मेसर्स अ‍ॅनिमल वेलफेअर असोसिएशन (694 रुपये), पुण्यातील मेसर्स पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स (729 रुपये), मेसर्स ब्ल्यू क्रॉस सोसायटी पुणे (748 ) या संस्थांना या अगोदरच या कामाचा ठेका देण्यात आला आहे. शहराचा वाढता विस्तार, महापालिकांच्या प्रभाग कार्यालयांची वाढती संख्या, बेवारस कुत्र्यांची तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता या कामासाठी मे. ऍनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडील नोंदणीकृत यादीमध्ये समाविष्ट असलेल्या आणि विषायाधीन कामाचा अनुभव असलेल्या अमरावती येथील मे.लक्ष्मी इन्स्टिट्युट ऑफ ऍनिमल वेलफेअर या संस्थेस (693 रुपये) ठेका देण्यात आला आहे. स्थायी समितीने याला मान्यता दिली.