कुत्रा हरविल्याची तक्रार

0

सांगवी : सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलिसांवर आता गुन्हेगार सोडून चक्क कुत्रा शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पोलीस कर्मचारी सीसीटीव्हीची मदत घेत आहे. ही घटना नवी सांगवी पोलीस चौकीच्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी कुत्र्याच्या मालकिणीने सांगवी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे. गुन्हेगाराच्या मागावर असणार्‍या पोलिसांना वेगवेगळ्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नवी सांगवी पोलीस चौकीच्या परिसरातील एका घरातून लॅब्राडोर जातीचा कुत्रा चोरांनी पळवून नेला आहे. याप्रकरणी या कुत्र्याची मालकीणीने सांगवी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे गुन्हेगार सोडून पोलिसांना कुत्रा शोधण्याची वेळ आल्याची चर्चा पोलीस ठाण्यात सुरू आहे. या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील चौकाचौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.