कल्याण : टिटवाळा नजीकच्या पळसोली जंगलात भटक्या कुत्र्यापासून जीव वाचवून बक-याच्या कळपात शिरलेल्या भेकर जातीचे हरणाच्या पिल्लाला वन विभागाने पकडले आहे .या भेकर जातीचे हरणाच्या पिल्लाला कल्याण नजीकच्या उर्शीड च्या पुढील पंचोळे येथील जंगलात सोडण्यात येणार असल्याचे कल्याण वनक्षेत्र पाल एस एस खेडेकर यांनी सांगितले.
काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पळसोली येथे कुत्री जोर जोरात भूंकत पाठलाग करत असल्याने वाट चुकलेले भेकर जातीचे चार महिन्याचे हरणाचे पिल्लू बकऱ्याच्या कळपात घुसले .काही वेळाने बकर्यांच्या कळपात भेकर जातीचे हरणाचे पिल्लू चालत असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वन विभागाच्या फाॅरेस्ट आधिकारी एस एस खेडेकर यांनी कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देवून वन विभागाचा कर्मचाऱ्याना घटना स्थळी धाडले .वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पळसोली गाठत या भेकर जातीच्या हरणाच्या पिल्लाला ताब्यात घेतले . त्याची पशुधन विकास अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करत ठणठणीत असल्याचे प्रमाणपत्र घेऊन त्याला बोरिवली जंगलात नेण्यात आले मात्र या पिल्लाला पुन्हा कल्याण नजीक च्या जंगलात सोडन्यास सांगण्यात आल्याने पुन्हा कल्याण नजीकच्या उर्शीड च्या पुढील पंचोळे येथील जंगलात सोडण्यात येणार असल्याचे कल्याण वनक्षेत्र पाल एस एस खेडेकर यांनी सांगितले.