नंदुरबार – पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर ४ कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. आहेनवापूर तालुक्यातील धनराट येथील ही घटना आहे. अनिकेत नाईक असे विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी अनिकेतवर कुत्र्यांनी हल्ला केला होता.
रविवारी संध्याकाळच्या सुमारास आश्रम शाळेमागील उष्टे अन्न खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुत्रे जमा झाले होते. त्याचवेळी तेथे शौचालयासाठी गेलेल्या अनिकेतवर चार ते पाच कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक व अधीक्षकांनी विद्यार्थ्याला तत्काळ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ह
लवण्यात आले होते. मात्र हाताच्या रक्तवाहिन्या फाटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.