लोहारा ता.पाचोरा । संसर्गजन्य असलेल्या खरूज आजाराचे संकर्मन आता गुरांवर येऊन ठेपली आहे. यामुळे आता पशुपालकांची चिंता वाढली हा आजार असा आहे की यांवर उपचार जरी केला तरी तो हळूहळू आटोक्यात येतो अशी माहिती मिळाली आहे. या आजाराची लागण पहिल्यांदा कुत्र्यांवर बघायला मिळाली त्यांचे प्रमाण इतके वाढले आहे की ही कुत्री बघितली तर अतिशय किळसवाणी वाटतात. हीच खाज या पशूंकडून होत आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी अगोदर पशुपालकाच्या लक्षात यायला हवे तरी या आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता तालुका किंवा जिल्हा पशु विभागाकडून त्याची जनजागृती व्हायला हवी. अन्यथा कुत्र्यांप्रमाणेच दशा गुरांची होईल अगोदरच हा आजार संसर्गजन्य आहे.
बर्याच प्रमाणात या आजाराविषयी अनेक पशुपालकांना माहिती नाही. तरी पशुसवर्धन विभागानेही या आजाराचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज भासू लागली आहे ही खरूज पांढर्या आणि काळ्या अशा दोन प्रकारात दिसून येतं असल्याने गरिबांचे गोधन धोक्यात येऊ पाहत आहे.