जळगाव । शेरी पहूर येथील दोन वर्षीय बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जिल्हा रूग्णालयात तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जय ज्ञानेश्वर पाटील (वय-2) रा. शेरी पहूर हा बालक घरासमोरील अंगणात खेळत असतांना त्यांने समोर बसलेल्या कुत्र्याला दगड मारला. दगड मारल्यामुळे कुत्रा सरळ अंगावर धावून आल्याने तोंडाला चावा घेतल्याने बालकाच्या गालावर लचके तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बालक गंभीर जखमी झाला असून जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.