कुदळवाडी येथील व्हॉलिबॉल स्पर्धेत दिल्लीचा रहमाती संघ विजेता

0

चिखली : कुदळवाडी स्पोर्टस् क्लबतर्फे घेण्यात आलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत दिल्ली येथील रहमाती स्पोर्टस् क्लबने विजेतेपद पटकाविले. कर्नाटकच्या गुप्ता स्पोर्टस् क्लबला उपविजेतेपद मिळाले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध राज्यातील संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले.

यावेळी कामगार नेते कैलास कदम, माथाडी नेते इरफान सय्यद, नगरसेवक संजय नेवाळे, नगरसेवक राहुलजाधव, नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक कुंदन गायकवाड, विलास यादव, उद्योजक संदिप मोरे-पाटील, उद्योजक लतिफ खान, उद्योजक देवानंद गुप्ता, उद्योजक नियाज सिद्धीकी, उद्योजक मालाराम चौधरी, उद्योजक याकुबभाई आदी उपस्थीत होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परवेज सिद्धीकी, आफताब खान, प्रविण मौर्या, मकसुद कपुर, अशफाक सिद्धीकी, मनोज गुप्ता, मेहताब खान, जमिरुल्ला चौधरी, मुज्जफ्फर सिद्धीकी, एजाज चौधरी आदी परिश्रम घेतले.