मुंबई: राज्याचा पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करताना दिसत असतांना भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडले. युती सरकारच्या काळात सर्वाधिक कुपोषणाचे बळी गेल्याचे आरोप खडसे यांनी केला आहे. मंत्रीपद गेल्यापासून एकनाथराव खडसे सातत्याने सरकारला लक्ष करताना दिसत आहे. अनेकदा ते त्यांच्या मनातील खदखद व्यक्त करतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
आज कामकाज सुरु होताच खडसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नांची सरबत्ती केली. सौरपंप, कुपोषण आदी विषयांवरून त्यांनी सरकारला लक्ष केले.