मुंबई । भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक व भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांने आपल्या पदाचा राजीनामा देेवू सर्वांना धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसापासून म्हणजे चॅम्पियन ट्रॉफीत कर्णधार कोहली व कुंबळे याच्यातील वाद समोर आले होते. यात बीसीसीआयने मध्यस्थी सुध्दा केली होती.मात्र काहीच परिणाम झाला नाही. मात्र कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी भारतीय स्टार फलंदाज सुनील गावसकर यांनी आपली नाराजी व्यक्त करित कुंबळे विषयी तक्रार करणार्या खेळाडूंचे कान टोचून काढले आहे.कुंबळे शिस्तबद्ध आहे. हीच बाब खेळाडूंना खटकत होती. शिस्तीचे पालन न करणारे खेळाडूच त्याच्यावर नाराज होते आणि त्यांना त्यांच्या पसंतीचा प्रशिक्षक हवा होता, असा ‘मास्टरस्ट्रोक’ गावसकरांनी लावला.
कुंबळे यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनाम दिल्यानंतर गावसकर यांनी खेळाडूंचा चांगला समाचार घेतला. सराव करायचा नाही,सराव नाही केला तरी चालेल,बरे वाटत नाही तर सुट्टी घ्या आणि शॉपिंग करा असे म्हणणारा प्रशिक्षक व्हावा.असा प्रश्न गावसकरांनी खेळाडूंना विचारला आहे.कुंबळे शिस्तबद्ध आहे. त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात संघाची कामगिरी उंचावली आहे.ज्यांना कुंबळे विषयी तक्रारी करणार्या खेळाडूंनी संघाबाहेर पडावे असा सल्ला वजा रागही व्यक्त केला.यापुढे प्रशिक्षकाला खेळाडूसमोर लोटागण घालावे लागेल किवा राजीनामा द्यावा लागेल.एका वर्षात कुंबळेने काही चुकीचे केलेय असे मला वाटत नाही.तरी त्याला राजीनामा द्यावा लागला. याचाच अर्थ त्या गटात आणि कुंबळेमध्ये नक्कीच काही तरी घडले आहे.
तत्पूर्वी राजीनाम्यानंतर कुंबळेने फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. माझी आणि विराटची भागिदारी न टिकणारी होती. कोहलीला माझी कार्यपद्धती आवडत नव्हती. विशेष म्हणजे बीसीसीआयकडून एक दिवस आधीच मला याबद्दलची माहिती मिळाली होती. माझी कार्यपद्धती पटत नसल्याने कोहलीला मी संघाच्या प्रशिक्षकपदी नको होतो. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासाठी मुदतवाढ देण्याची तयारी दर्शवली होती. बीसीसीआयने दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी आभारी आहे, असेही त्याने या पोस्टमध्ये म्हटलय आहे.