कुमारस्वामी यांनी मोदींचे चॅलेंज झिडकारले

0

बंगळूर-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले फिटनेस चॅलेंज कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी झिडकारले आहे. नरेंद्र मोदी यांनी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना फिटनेस चॅलेंज दिले होते. मात्र आपल्याला राज्याच्या फिटनेसची जास्त चिंता असल्याचे सांगत कुमारस्वामी यांनी मोदींचे चॅलेंज स्विकारण्यास नकार दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी दिलेल्या फिटनेस चॅलेंजला कुमारस्वामी यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही माझ्या तब्बेतीची काळजी दाखवलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. फिटनेस खूप महत्वाचे आहे. मी रोज योगा-ट्रेडमिल करतो आणि तो माझ्या व्यायामाचा भाग आहे. पण मी माझ्या राज्याच्या विकास, फिटनेसबद्दल जास्त चिंतित आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.