नांद्रा । कुरंगी येथील सरपंच गजानन पवार यांनी 16 डिसेंबर रोजी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर मंगळवार 9 जानेवारी रोजी दिपक आनंदा मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नांद्रा मंडळाधिकारी आर.एस.मोरे, तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी कपील परखड यांनी काम पाहिले. दिपक पाटील यांचा सरपंच पदाचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच गजानन पवार, उपसरपंच आमिनशेख, ग्रा.प.सदस्य सुदाम पाटील, उषाबाई पाटील, वंदनाबाई पाटील, सुरेश कोळी, मंगलाबाई भोई, इंदुबाई सोनवने, विमलबाई पाटील, कमलबाई भिल्ल उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्काराप्रसंगी माजी आमदार दिलीप वाघ, नितिन तावडे, सुभाष पाटील, शेवरे, आनंदा मोरे, गणेश कोळी, योगेश पाटील, नामदेव पवार, कैलास पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.