नांद्रा । महसुल विभागातर्फे जिल्ह्यात वाळूचा ठेका देण्यात आला आहे. मात्र लिलाव झालेल्या वाळूच्या गटातून वाळू न उचलता इतर गटातून ठेकेदार वाळू उचलत आहे. त्यामुळे संपप्त झालेल्या कुरंगी गावातील ग्रामस्थांनी ट्रक्टरचालकांना वाळू न उचलण्याचा पवित्रा घेत पाचोरा तहसीलदार यांना लेखी तक्रार सादर केल्यानंतर तक्रारची दखल घेत तहसीलदार यांनी गिरणापात्रात भेट देवून वाळू उपसा थांबविण्यात आले असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार कुरंगी येथील गिरणा नदीच्या पत्रातील 399 क्रमांकाच्या वाळूच्या ठेक्याची विक्री करण्यात आली आहे. त्यानुसार ठेकेदाराने येथील गटातील वाळू न उचलता इतर गटातील वाळून उचलत आहे. तसेच ही वाळू प्रमाणपेक्षा जास्त क्षमतेची असल्याचे कुरंगी गावातील नागरीकांच्या लक्षात आल्याने काही नागरिकांना याला विरोध केला असून तशी तक्रार देखील तहसीलदार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार तहसीलदार, मंडळाधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. दरम्यान, गिरणा नदी पत्रात सध्या आवर्तन सोडले असल्याने वाळूचा गेलेला ठेका क्र. 399 हा पुर्णतः पाण्यात गेल्याने इतर ठिकाणाहून वाळूचा उपसा करत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यानुसार तहसीलदार यांनी 399 चा वाळूचा भागचा परिसर कुठपर्यंत आहे. हे ठेकेदारांना दर्शविणार असल्याची माहिती समोर आली आहे.