कुरंगी-बांबरुड गटातील विकासकामांचे भूमिपुजन

0

पाचोरा। आमदार किशोर पाटील व जिल्हा परिषद सदस्य पदम पाटील यांच्या हस्ते कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटातील नांद्रा,वरसाडे, डोकलखेडे, आसनखेडा येथे आमदार व झेडपीच्या निधीतुन विविध विकास कामे मंजुर करण्यात आली आहे. मंजुर कामाचे भूमिपुजन करण्यात आले आहे. नांद्रा येथे आमदार निधीतुन पाच लाखाच्या निधीचे रस्ते कॉक्रीटीकरण, दलित वस्तीतील भुमिगत गटारी व पाण्याची बस्की टाक्यासाठी 10.5 लाखाचा निधी, 14 वे वित्त आयोगातुन पेवर ब्लॉक बसवणे, वाटर सम व कॉक्रीटीकरण निधी 15 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

यांची होती उपस्थित्ी
यावेळी अ‍ॅड.देवरे, कृउबा सभापती उध्वव मराठे, राजु पाटील, नांद्रा येथील सरपंच हेमलता सुर्यंवंशी, सरपंच आशाताई भिल, आसनखेडा सरपंच कैलास पाटील, यशवंत पवार, पंढरीनाथ पाटील, डी.के पाटील, मनोज पाटील, सुनिल पाटील, भगवान पाटील, तात्या पाटील, मुन्ना डॉक्टर, अजय जयस्वाल सुभाष पाटील, बालु हिलाल, सुनिल पाटील, नवलसिंग पाटील, प्रशांत पाटील, सुनिल जावळे, राजु पाटील, जयवीर पाटील यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पाठपुरव्याला यश
आमदार किशोर पाटील व जिल्हा परिषद सदस्य पदम पाटील यांनी गटातील विकास कामांसाठी वारंवार पाठपुरावा केलेला आहे त्याच्या पाठपुराव्याला यश कामे मंजुर झाल्याने यश आले आहे.