कुरणवस्ती शाळेला ईलर्निंग संच भेट

0

चिंबळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरणवस्ती (निघोजे) शाळेला रोटरी क्लब आकुर्डी, पुणे यांच्याकडून शाळेसाठी ईलर्निंग संच व विद्यार्थी वाचनालयासाठी दोनशे पुस्तकांची भेट देण्यात आली.स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक संसाधनाद्बारे उच्च प्रतीचे शिक्षण देण्यासाठी रोटरी क्लब कायम योगदान देत असते.

यावेळी रोटरी क्लब चे मेंबर मनिष चुघ,पंकज देशमुख तसेच इंडियन सोशल ग्रुपचे प्रेसिडेंट कैलास पारेख,वसंत ग्रुपचे सुनिल निकम,प्रल्हाद पारेख, महादेव कोळेकर, निघोजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष येळवंडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र आल्हाट,रामदास येळवंडे,रुपाली येळवंडे,नम्रता येळवंडे,रिठाबाई सोनवणे,सुनिता शिंदे व मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज येळवंडे, उपाध्यक्ष गणेश येळवंडे तसेच सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सतिश खेडकर यांनी केले व कविता गट मॅडम यांनी आभार मानले.

कुरणवस्ती शाळेला ईलर्निंग संच तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढून त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेला पुस्तके उपलब्ध करून देताना रोटरी क्लब ला आनंद होत असल्याबाबतचे विचार रोटरी क्लब च्या प्रेसिडेंट उज्ज्वला जोशी यांनी यावेळी मांडले. ग्रामपंचायत सदस्य निलेश पवार यांनी रोटरी क्लब च्या कामाचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली.