धनकवडी । गुरुवार पेठेतील कुरिअर व्यावसायिकाकडे असलेल्या नोकरानेच 12 लाख 40 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. स्कंदकुमार अजयवीर सिंह (30, रा. उत्तरप्रदेश) आणि रघुवीर उर्फ लखन बैजनाथ सिकरवार (रा. उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश परमार (40, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे गुरुवार पेठेत कुरिअर कंपनी आहे. यातील आरोपी स्कंदकुमार हा त्यांच्याकडे डिलीव्हरी बॉय म्हणून कामास होता. फिर्यादी यांना बाहेरगावी जायचे असल्याने त्यांनी त्याच्याकडे कामगारांच्या पगारासाठी आणि मुलांच्या अॅडमिशनसाठी 3 लाख 60 हजार रुपये दिले होते.