कुरीयरची रक्कम लांबवणार्‍यास कोठडी

0

पाचोरा : ऑनलाईन पार्सलची भडगाव येथे डिलेव्हरी करून पाचोर्‍याकडे परतणार्‍या डिलेव्हरी बॉयच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीवरून आलेल्या सहा चोरट्यांनी 64 हजारांची रोकड तसेच 35 हजार रुपये किंमतीचे पार्सल लांबवल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण दहा आरोपींना अटक झाली असून सोमवारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत 35 हजारांची रोकड व चार पार्सल जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोपींना पोलीस कोठडी
संशयीत आरोपी राहुल माधवराव वाघ (23, भडगाव रोड, भडगाव), दिनेश उर्फ बबलू हरी महाजन (21, रशवंत नगर, भडगाव), सतीश हिरामण पवार (19, रशवंत नगर, भडगाव), वैभव संजर वाघ (19, रशवंत नगर, भडगाव), वाल्मिक गुलाब फुलझिरे (19, रशवंत नगर, भडगाव), संजर सुरेश त्रिभुवन (22, वाक, ता. भडगाव), प्रवीण उर्फ सोनू बापूराव पाटील (23, भडगाव पेठ, ता.भडगाव), सागर छोटू जाधव (21, गिगाव, ता. मालेगाव), सागर शांताराम चव्हाण (19, चिंचगव्हाण, ता.मालेगाव) अशा दहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.