कुरुळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुभद्रा सोनवणे

0

चिंबळी : कुरूळी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुभद्रा सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी, यासाठी उपसरपंच विद्या बागडे यांनी स्वकुशीने उपसंरपच पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच बाळासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रीया पार पडली.

उपसंरपच पदासाठी शुभद्रा सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने कुरूळीच्या उपसंरपचपदी शुभद्रा सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सोनवणे यांनी घोषीत केले. याप्रसंगी, ग्रामविकास अधिकारी छाया इरणक, आदर्श सरपंच चंद्रकांत बधाले, मावळत्या उपसंरपच विद्या बागडे, ग्रा.पं सदस्य देवराम सोनवणे, शरद मुर्‍हे, सचिन कड, विजय काबंळे, प्रज्ञा गुरव, नगिना मेदनकर, सुनंदा बागडे आदी उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित उपसंरपच शुभद्रा सोनवणे यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, माजी सरपंच एम. के. सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर, भंडार्‍याची उधळण करीत सवाद्य गावातून मिरवणुक काढण्यात आली. निवडीबद्दल सोनवणे यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.